उपवास
*****
श्रद्धाळू मनाचे सरे उपवास केलेले सायास पूर्ण झाले ॥१
कुणा न ठाऊक काय मिळवले
काय गमावले कुठे किती ॥२
परी दृढ गाठ बसली मनात
झाली बळकट श्रद्धा एक ॥३
उठली मनात प्रार्थना ही खोल
ओठी आले बोल ज्ञानेशाचे ॥४
हरवली मात अस्तित्वाचा अर्थ
माणसाची जात सुखी कर ॥५
रहा रे कृपाळू सदा जगावर
दुःखाचा आकार मिटवून ॥६
बाकी तो आहार कुणा निराहार
व्यर्थ कारभार झाला उगा ॥ ७
विक्रांता कळला अर्थ उपवासी
जोडलो देवासी जगताशी ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा