भास
*****
ऐसा पाठीपोटी दत्त घनदाट पाणि पाणियात मिसळले ॥१
द्वैताची झुळूक जन्मा ये लहर
निमे हळुवार जीवनात ॥२
सुवर्ण शलाके कारण अरुण
जाता अस्तावून तीही नाही ॥३
तैसे माझेपण दुजे दत्ताहून
अंतरी जाणून मीची दत्त ॥४
परी ते कौतुक मिरवतो वरी
भक्तीच्या लहरी नांदुनिया ॥५
विक्रांत वेगळा दत्तात आटला
दिसे जगताला भास उगा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा