सोमवार, २४ एप्रिल, २०२३

बीजेचा चंद्र

बीजेचा चंद्र
**********

तुझिया बीजेची दिसे चंद्रकोर 
आनंद मोहर मन झाले ॥१

इवलीशी रेखा जणू भाळावर 
कोणी तालेवार मिरवती ॥२

तैसे ते आकाश प्रोढीने भरले 
शुक्र विसरले भरजरी ॥३

पश्चिमेची गाणी आली कानावर 
दूर रेतीवर उमटली ॥४

कुठे उगवली कुठे पेरलेली 
श्रद्धा थरारली मनातली ॥५

पाहता पाहता देखावा सरला 
आभास मिटला विलक्षण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महापुरुष

.महापुरुष  **** महापुरुष बरे असतात  जन्मदिवस पुण्यतिथी  साजरे करण्यासाठी  हार माळा फुले  फोटोवर पुतळ्यावर उधळून गाणी गाण्यासाठी ...