प्रेम
*****
धरतीच्या भेटी मेघ आसुसले सर्वस्व सांडले मग त्यांनी ॥१
नाव न उरले गाव न उरले
एकरूप झाले तन मन ॥२
थेंबथेंबातून प्रेमाची कहाणी
येई ओघळूनी ओली चिंब ॥३
असेच असते प्रेम खरेखुरे
व्यवहार सारे बाकी व्यर्थ ॥४
राधाकृष्ण जरी नाव असे दोन
एकएकाहून भिन्न नाही ॥५
विक्रांत घेऊन राधा हृदयात
कृष्ण डोळीयात साठवतो ॥६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा