भक्तिगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्तिगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ जुलै, २०२२

प्रेम



प्रेम
*****
धरतीच्या भेटी मेघ आसुसले 
सर्वस्व सांडले मग त्यांनी ॥१

नाव न उरले गाव न उरले 
एकरूप झाले तन मन ॥२

थेंबथेंबातून प्रेमाची कहाणी 
येई ओघळूनी ओली चिंब ॥३

असेच असते प्रेम खरेखुरे 
व्यवहार सारे बाकी व्यर्थ ॥४

राधाकृष्ण जरी नाव असे दोन 
एकएकाहून  भिन्न नाही ॥५

विक्रांत घेऊन राधा हृदयात 
कृष्ण डोळीयात साठवतो ॥६

जगदीश महाराज (झगडीया मढी)

जगदीश महाराज  (झगडीया मढी)  नर्मदाकाठच्या कविता *************************** निर्मळ डोळ्यांचा मधुर वाणीचा  नर्मदा तीरीचा साधू एक ...