स्वप्न दर्शन
******:
पाहिले स्वप्नात स्वामी माधवनाथ पथात चौकात दिसले अकस्मात ॥
गुरु पौर्णिमा काल उलटून जाता
पहाटे पहाटे आज ती जाग येता ॥
मज प्रिय झाले जे हृदयी भरले
जरी प्रत्यक्षात ते कधी न भेटले ॥
श्री स्वरूपानंदांचा शिष्योत्तम तो
सोह हंसारुढ असे पुरुषोत्तम तो ॥
नव्हते स्मरण कित्येक दिवसात
अभ्यास वाचन घडले वा ग्रंथात ॥
पाहून तयाला हा जीव आनंदाला
तरी घेतओळख स्पर्शलो पदाला ॥
सुखानंद जणू तो डोलत चालला
प्रसन्न हास्यप्रभे जगत उजळला ॥
बस इतुकेच झाले दर्शन दुबारा
पुन्हा एकदा असे गुरुपौर्णिमेला ॥
गुरुपौर्णिमा असे त्यांची पुण्यतिथी
मोहर उमटली ती जणू गुरु भक्ती ॥
अस्थिर मनास बोलता न आले
पाहता न आले सांगता न आले ॥
उरी दाटलेले या आभाळ भरले
जरी तया मज वाहता ना आले ॥
परी दाटली जी मनी प्रसन्नता ती
तिचे अप्रूप मी सांगू तरी किती ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा