मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

शब्द


शब्द
*****

शब्द नाजूक कोवळे 
रस तालात भिजले 
जीव बेभान बेधुंद 
अहा वाहावी गुंगले 

शब्द मवाळ मोटके 
पर तत्वात भिजले 
लावी सार्थकी जीवन 
प्राण प्रकाशी पेटले 

शब्द मनाचे तान्हुले 
भाव बंधानी नटले
करी आकांडतांडव 
कधी हसून निजले 

शब्द नागमोडी वाट 
कुणा क्वचित कळली 
कुणा मुक्कामी सोडवी 
कुणा घाली रानभूली 

शब्द सोयरे ते माझे 
मैत्र जीवीच्या जीवीचे 
तया वाचुनिया शून्य 
जिणे विराण वाटेचे 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  

1 टिप्पणी:

  1. डॉ. तुमच्या सर्व कविता खूप सुंदर 👌👌👌
    आहेत.
    मी पण एका अँप वर कविता करण्याचा प्रयत्न करते.
    मुक्तछंद हा प्रकार करते.

    उत्तर द्याहटवा

खूण

खूण **** मनाच्या कपाटी जपून ठेवला बंद कुलुपात कुणा न दाविला ॥ तोच तो राजस सुंदर चेहरा  अति मनोहर लोभस हसरा  ॥ कुणी ग चोरला कुणी ...