जीवनभास
आशा खुळ्या मनात
रंगवुनी क्षण उलटती
जगणे भास असे हा क्षणात
सांगुनी जाती
वाटेवरच्या साऊल्या कधी कुणासच मिळती
चटके ज्या पावूलास अरे तेच दु:ख जाणती
लाख जाणूनी मोह मनाचे अजुनी नच सुटती
गंध कुठले रंग नवे हे प्राणास ओढूनी नेती
कोंडलेल्या मनात अनवट सूर अजुनी उमटती
येता कुठली रुणुझुण कानी श्वास हे अडकती
जरी जाणती रानपारधी विभ्रम नवे मांडती
जरा जगूया म्हणून कुणी त्यात उगा धावती
बघतो विक्रांत तिमिरी कैसे किरण कुणा दिसती
मलीन मनी विवश देही कैसे कमलदल फुटती
दाटून चंदन घमघमणारा ही वाट कुठे नेती
पडला कोण सुटला सारी दृश्य कुठे हरवती
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा