गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

लिहावितो गाणी दत्त






लिहवितो गाणी
दत्त माझ्या मनी
देई शिकवणी
माझी मला ||१||

मी तो भटकळ
पतित अडाणी
करी रीझवणी
प्रभू शब्दे ||२||

नेई पुढे पुढे
कौतुक करूनी
तयाची करणी
तोच जाणे ||३||

नका करू दोस्त
माझी भलावण
असे मी खेळण
तया हाती ||४||

जाणतो अवघे
पाहून विक्रांत
दत्त भगवंत  
सर्वव्यापी ||५|| 



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 


..................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्री वासुदेवानंद सरस्वती

प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज **************** आनंदकंदा श्री वासुदेवनंदा  तोडी भावबंधा आमच्या तू देई ज्ञान शक्ती देई भावभक्...