काळ्या डोहात
बुडाले स्वर्ग सुवर्ण डोहाळे
चिंचा आवळ्या सकट
गेली हरवून बाळे
माय रडते बेभान
जग भकास नजरी
किती जळणार इथे
दीप कराळ अंधारी
झाल्या कवड्या
डोळ्यांच्या ऋतू उलटून गेले
रान हिरवे का
होते प्रश्न भयाण पडले
माती मनात ओली सय
कुठल्या पाटाची
ओझे उद्याचेच डोई
वाट पायाला गाळाची
एक रुखरुख खोल
पाने गळून पडली
कुण्या घरट्या
आडोसा नच सावली उरली
किती फुटावे पहाड
कोसळावे देवदार
बिंदी माथीची
पुसली मेंदी फिकी हातावर
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा