देही पांघरून उन
वृक्ष सोनेरी कोवळे
छाया उदास तरीही
थोडी पायाशी
रेंगाळे
जन्म हिरवा पोपटी
दृष्ट लावतो
जीवाला
साऱ्या रानात
पसारा
काट्यां कुट्यांचा
पडला
बाई वेचते जळण
काटे बोटात रुतले
चार चिंध्यानी मन
ऊन भाकरी हसले
फुले चारच दिसांची
गंध धावे रानोमाळ
रान टपून बसले
कसा करावा सांभाळ
भूक चिवट चुकार
घेते ओढून तोडून
फळ पिकण्या आधीच
जातो बहर मरून
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा