शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

क्षितीज भास







ती गर्दी ती माणसे
ते सूट ते बूट
ते अलंकार ती वर्दळ
ते रंग ते गंध
अन या सगळ्यात
कॅमेरागत
पुढे सरकणारे मन
होते क्षण क्षण टिपत
सारे निरखत
त्या कोलाहलाचा
एक भाग होवूनही  
त्यात वावरत
अलिप्तपणे ...

बाजूच्या क्रीडागंणावर
चाललेले क्रिकेट
फटक्यांची नजाकत
धावावर धावा  
पडणाऱ्या विकेट
सर्वत्र पसरलेली
धुळीची पुट
पण या जगाचे त्या जगाला
नव्हते सोयर सुतक....

आला तो गेला तो
एक पान दिवसाचे
उलटून पुढे सरकला तो
वेगळी जागा वेगळा ठसा
वेगळा रंग बस इतकेच
काळात निमाला एक सूर्यास्त
क्षितीज भास मागे ठेवत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नशीब( उपक्रमासाठी)

नशीब   (उपक्रमासाठी  ) ******* घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळत नाही  क्रम उमजत नाही  कारण मीमांसा कळत नाही  बोल कुणाला देता येत नाही  ...