मना करी रे करी ध्यान
हृदयी ठेवी दत्त
भगवान ||
मना सांडी रे
सांडी व्यथा
जना सांग धन्य गुरुकथा
गुरुचरित्र असे हे
तारक
तुटे कोटी जन्म
बंधन ||१ ||
मना चाल रे चाल
शिखरी
देव दत्त बघ गिरनारी
काय वर्णू तेथची
बात
कणकण गर्जे दत्त
गाण ||२ ||
मना जाई रे जाई
कृष्णातीरी
गुरुपीठ श्री
गाणगापूरी
दंड धरून गुरु नृसिंह
भक्ता रक्षी रूपी
निर्गुण ||३||
मना थांब रे थांब
क्षणभर
प्रेमे आळव दत्त दिगंबर
घडो वा न घडो तप
ध्यान
प्रभू येतील रे
धावून ||४ ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा