बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

सारे नावावर दत्ता






सहज कंटाळा 
आला जगण्याचा
देह ओढण्याचा 
उगाचच ||
ओढले ताणले 
उगा या मनाला
जणू वितळला 
रबर हा ||
शून्यात निमाली 
सारी हालचाल
शून्याचा महाल 
कोसळला ||
नको येरझार 
नको फेरफार
सारे नावावर 
दत्ता तुझ्या  ||
विक्रांत जाहला 
दिवाळखोर
मोडून व्यापार 
वासनांचा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हौस

हौस **** रित्या अंतरात रिताच कल्लोळ  शून्याचा महाल शून्यातच  त्याच त्या सुखाचा उठे पडसाद  जीर्ण अवसाद घेऊनिया  कोसळती उल्का कळल्...