शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

बाजार

 


विद्येचा बाजार खेळाचा बाजार 
धनाचा जोजार  जिथे तिथे 
देवाचा  बाजार दुव्याचा बाजार 
पाखंडी अपार  जागोजाग 
औषधी  बाजार दुःख डोहावर 
कंपन्यांनी थोर  रचियेला 
लग्नाचा बाजार  वस्तु  वधूवर 
माल प्रतवार  मांडलेला 
डॉक्टरी बाजार ज्ञान पैशावर
चाले उपचार  वसुलीला
शक्तीचा  बाजार  संघ मजदूर 
भोळा  कामगार  प्यादे फक्त 
सत्तेचा बाजार काळ्या धनावर
मता  मतावर  लक्ष्मी वास 
मायेचाच जोर चाले जगावर 
उगा  तोंडावर तत्व बित्व 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वरदान

वरदान ****** उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला  थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला    मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा  व्याकुळले प्राण...