मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

उपाधी...






कैसा अधिकार 
कसलीही सत्ता |
देवा तुझ्या हाता 
दोर माझी ||

चुकुनिया आला 
हातात अंकुश |
नको नको त्यास 
ठेवू हाती   ||

करू नको मना 
व्यर्थ यातायात |
प्रभू स्मरणात 
आडकाठी ||

कशाला उपाधी 
आता दत्तनाथा |
होई मी वाहता 
कासावीस ||

करुनी भणंग 
देई अपमान |
अहंता पुसून 
टाक माझी  ||

तुझिया प्रेमाचा 
देवूनी प्रसाद |
जाहले प्रमाद 
घाली पोटी ||

आणिक न उठो 
मनात एषना |
संगती सज्जना 
घडो यावी ||



डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...