अभिमानाने असे रडणे
मस्त असते दोस्त
संतापाने असे फुटणे
रास्त असते दोस्त
मान खाली घालून तर
नेहमीच जगतो आम्ही
तुझ्यामुळे आकाश हे
छातीत भरते दोस्त
बाकी सारी त्यांची ती
नेहमीचीच हाणामारी
तुझ्यामुळे जखमांचे
शुभ्र फुल होते दोस्त
म्हणतीलही ते तुला
आहे ढाल पाठीवरती
पण अशी तलवार तेज
कुणाकडेच असते दोस्त
सारे सुप्त ज्वालामुखी
होते कधीच विझलेले
पण तुझ्या तडकण्याने
झाले आता पेटते दोस्त
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा