रविवार, २६ एप्रिल, २०१५

विष्षण माझ्या मनात आले






विष्षण माझ्या मनात आले
तेच कालचे स्वप्न देखणे
काळोखी मग किर्र बुडाले
प्रकाश रिंगण इवले साने

जरा जगू दे अरे जीवना
गीत म्हणू दे श्वासामधले
कुठल्या दिशे मधून येती
क्षण उदास धुरकटलेले

एक सावळी मूर्त कोरली
पुन्हा मनात उभी राहिली
हसरे डोळे नितळ काळे
हृदयातील तार तुटली

जरा जरासा हर्ष जागला  
पुन्हा तमात मिटून गेला
शोधू कुठे मी प्राणामधला
स्पंद इवला थरथरला  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नर्मदामाय

नर्मदामाय ********* माझे येणे तुझ्या दारी  घडेल गं कधी माय मनातील आस माझ्या पुर्णत्वा जाईल काय ॥ तुझे जळ खळखळ  मधू रव नादमय शिरा...