बुधवार, ८ एप्रिल, २०१५

प्रकाशाचा तुकडा






जळो आता देह माझा
झडो पापण्यांची पाने
खंड खंड नष्ट व्हावी
वेडगळ सारी स्वप्ने

झिजणाऱ्या हाडावर
असे मातीचीच सत्ता
कसे कुणा कळायचे
तया खाली कोण होता

वायफळ धडधड
उरामध्ये चाललेली
अरे सांग कश्यासाठी
जिंदगी ही पेटलेली

क्रुसावर कुणी गेला
कुणी समाधिस्त झाला
प्रकाशाचा तुकडा तो
कुठे कसा हरवला  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...