बुधवार, १ एप्रिल, २०१५

म्हाताऱ्याची आत्महत्या







जगून खूप झालय जीवना
फूट आता मरून जातो   
ओझे वाहून थकलो तुझे  
पुरे आता फेकून देतो  


तुझी उष्टी सुखं किती
ओरपून मी चाखली इथे
कळून चुकले पण आता
किती मज फसवले तू ते


किती असावे हलकट कुणी
खरेच दाखवून दिलेस तू  
वेचलेल्या प्रत्येक फळात
किडीस पेरले होतेस तू


आणि फिरविले बैलागत
पोट चाकरी लावून पाठी
मरणाची दावूनी भिती  
नाडलेस रे दिवसाकाठी


दिला तसाच देह फटका
सुमार व्याधीत मळलेला
अन अभिमानी मन वरी
मीठ जखमेवर चोळायला


वृद्ध घोडा मरून जाता
तुला फरक पडत नाही
पण तरीही लक्षात घे रे
तू मला मारत नाही


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


२ टिप्पण्या:

  1. फुका दोष मजशी का?
    तूच स्थूलवलेस मला
    ओझे माझे नव्हेच काही
    मी तर अदृश्य सहचरी

    उस गोड लागला तरी
    मुळीसह चघळेस तू !
    खोट्या आरोपांच्या पिंजऱ्यात
    मला अलगद अडकविलेस तू

    स्वपापाचे पुण्य(?) आता
    शिरी माझ्या देऊ नको
    किडकी फळे निवडताना
    विवेक गहाण टाकलास तू

    पोटासाठी हात हलविणे
    हा तर नियतीचा नेम आहे
    फुका मरणास घाबरून
    अहोरात्र फिरलास तू

    स्वकर्माने पवित्र देहास
    उद्वस्थ जर्जर केलेस तू
    अभिमानाचा पिंपळ मनी
    सदैव ताठ ठेवलास तू ....

    जन्म मृत्यूच्या टोकामाध्ले
    जीवन माझे नाव आहे
    अडखळनारी तूच माझी माउली
    अन फिरतो तुझ्याच पावली

    अचल मी, अदृश्य मी
    गतिहीन मी, मतिहीन मी
    बेधुंध मी, मधहोश मी,
    उद्वस्थ मी, क्षतीग्रस्थ मी

    (अरे वेड्या,)
    मी तुझे ओझे नाही, तर तूच माझे ओझे,
    थरथरणाऱ्या तव तनुखालती
    भिरभिरणाऱ्या तव नजरेखालती
    मी तर ..... तुझीच सावली

    उत्तर द्याहटवा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...