गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

तिसऱ्या लेनचा स्वामी




तिसऱ्या लेनचा
स्वामी आहे मी
कुणासाठीही लेन
सोडणार मी नाही

हॉर्न वा सायरन
कितीही वाजोत
कुणाकडेही कधी
पाहणार मी नाही

होवू दे गलका
वा शिवराळ कुणी
या माझ्या कानाने
ऐकणार मी नाही

मला न घाई
कुठे पोहोचायची
तुमच्या लेनलाही
शिवणार मी नाही 

सुसाट जा पुढे
दोन्हीही बाजूनी
कर्तव्य न मजला 
विचारणार मी नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संजय तिकोणे सर (सेवापूर्ती दिना निमित्त )

संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त ) *********************** तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय !  संजयला आम्ही भावंडं  स...