गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

रेवा माई साद देई




काही नाही काही नाही
इथे माझे कुणी नाही
कासावीस जीव झाला
सारे सारे सोडू पाही

रोज रोज तेच ओझे
भार कमी होत नाही
किती मारू येरझऱ्या
त्याला काही अंत नाही

खुणावते आकाश ते
रेवा माई साद देई
उताविळ पावूलांना
धीर धरवत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैल .

बैल. **** कुठे जातात ते गोऱ्हे आणि बैल  कालवाडी सोबत जन्मा आलेले गाई सोबत वाढलेले . कधी खच्ची केलेले  कधी मोकाट सोडलेले आम्हाला ...