सोमवार, २ सप्टेंबर, २०१३

थँक्यू मुल्ला नसरुद्दिन



भेटता तू आनंदाने
जीवन गेले भरून
हसतांना तुजसवे
पीसच गेलो होवून

तुझ्यासम विलक्षण
मी न पहिला अजून
तुला माहित अवघे                                      
काही माहित नसून

अजब तुझ्या तर्काने
मनी विस्फोट होवून
उकळ्यांनी गदगद
जीवही गेला थकून

हसत होतो तुजला
गप्पा तुझ्या ऐकून
पाहत होतो स्वत:ला
तुला आरसा करून

नात्याविन एक नात
गेले तुजशी जडून
परम मित्र झालास तू
थँक्यू मुल्ला नसरुद्दिन

विक्रांत प्रभाकर              

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...