बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

कळल्या वाचून कसले जगणे






रे काही कारण
वे जगायला  
जन्म कळायला
खराखुरा

थवा पाषाण
होवून राहणे
आणिक संपणे
व्यर्थ इथे

कळल्या वाचून
कसले  जगणे
दिवस रेटणे
पुढे पुढे

पशुही जगतो
खावून पिवून
गल्लीत हिंडून
पापुल्या

आपुल्या शोधत
आपण हिंडणे
रडणे पडणे
जरी कदा

तेच खरे पण
असते जगणे
इतरा लोढणे
जन्म फुका  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल ...




वेदनांच्या महालात
आर्त बोल डोळीयात
किती किती आणखीन
काय नसे यास अंत

जगण्याचा शाप होता
मरणाच्या सावलीत
क्षण क्षण भार होता
व्यतिलेला नरकात

का मलाच पुसावी ही
व्यर्थ होती यातायात
कीड लागे कुण्या फळा
वृक्ष वेली नसे ज्ञात

काही नवी काही जुनी
दवा दारू पदरात
मंत्र तंत्र देव संत
बांधलेली ताइतात

जगण्याचा लोभ क्षोभ
दाटलेला काळजात
आणि व्यथा नकोशी ती
देहा संगे घेवू जात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

बंध तुटावे...





काच तडकली न ये सांधून
जरी ठेवली कुणी जुळवून
विभक्तपण ते दिसते उठून
विद्रूप भेसूर प्रकाश फाटून

कसे कुठवर रेटू जगणे
व्यवहारातील खोटे हसणे
आता घडावे हरवून जाणे
तमी नकोच्या मिटून पडणे

कुणा कुणाही कळल्यावाचुन
डाव मोडला घ्यावा आवरुन
हळवी फुंकर काळ ओठांतून
येवून जावी प्रकाश घेवून  

पेशी पेशी अवनत होवून
लाही लाही उरात विरून
बंध तुटावे सूटल्यावाचून
क्षण तो एक,मग अंधारून 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...