रविवार, २८ जून, २०१५

स्वामी नित्यानंद




स्वामी नित्यानंद | समाधी दर्शन |
घेवूनीया मन | आनंदले ||१||
तयाच्या कृपेची | जगास प्रचिती |
माझ्या मनी दीप्ती | प्रकाशली ||२||
जयास भेटला |सावळा तो कृष्ण |
आहेत ती धन्य | नरनारी ||३||             
तयाच्या मंदिरी | शांती समाधान |
पातले हे मन | न मागता ||४||
भेटे ज्ञानदेव | भेटे दत्त राज |
ऐसे मज आज | वाटले ते ||५||
गुरुशक्ती एक | कळो आले गुज |
ओघळे सहज | कृपा आत ||६||
इथेच पंढरी | नि अलंकापुरी |
कळले अंतरी | आपोआप ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




मंगळवार, २३ जून, २०१५

देव माझा काल्पनिक




असेल ही देव
माझा काल्पनिक
त्रिशिर
त्रिगुणात्मक ..

नसेलही मागत
भिक्षा कुठं
वा हिंडत कुत्रांसोबत
राहत इथं तिथं...

मनाला चित्रं
जी आवडतात
देवा पाहतात
त्या रुपात

असेलही खरा
हा सिद्धांत
कदाचित  
मग आता पुढं ...??

काही नाही
मीच होतो दत्त
अन जातो भटकत
दिशांचे वस्त्र
देही पांघरत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, २२ जून, २०१५

ब्रेक नंतरची व्हर्टूअल भेट



     

ती : हाय डीसिव्हर कसा आहेस ?
तो : हा ? अरे अजून ब्लॉक केलं नाहीस ?
    मी तर मस्त मजेत !!
    तुझं कसं चाललंय ?
ती : ठिक आताच कॉलेज मध्ये जावू लागलेय .
    आणि तू कमीने,
    कुठली सुंदर पोरगी शोधली म्हणे
    खर की काय ?
तो : हे हे ,चलती का नाम जिंदगी .
    तू पण शोध एखादा चांगल्या घरातला
    शिकला सवरला ,परदेशी गेलेला
    वा जावून आलेला.
ती ; काही गरज नाही फुकटच्या सल्ल्याची
    कुणी मागितला नाही
    माझं मी बघेन काय करायचं ते
    आणि हो, त्या बिचारीलाही फसवू नकोस
    आहे त्याहून बाजारी होऊ नकोस
तो : परत परत तेच काय ,
    पुन्हा डोक फिरलं की काय .
    जावू दे बाय
    आणि हाय केल्या बद्दल थॅक्स
ती : डोम्बालाच थॅक्स,
    चिखलात दगड फेकायची सवय माझी
    अजून जात नाही बाकी काय नाही ..

        विक्रांत प्रभाकर
        http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...