अस्तित्व
********
तू मेघ आषाढाचा माझ्या जीवनात बरसला असा जन्म सुखावत ॥
तू डोह यमुनेचा माझिया डोळ्यात
हरवून तृषा मी झालो पूर्ण तृप्त ॥
तू चंद्र पुनवेचा माझिया मनात
स्मरून तुला मी नाहतो अमृतात ॥
तू गंध बकुळीचा माझिया श्वासात
मी धुंद सदैव तुझ्या अंगणात ॥
तू स्पर्श पालवीचा मृदुल काळजात
मी थांबून क्षणात ठेवी हृदयात ॥
तू अस्तित्व हे माझे घेतले पदरात
उरलो न मी आता व्यर्थ या जगात ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा