खेळ
*****
अपार मेघांनी भरलेल्या आकाशात
असतेस तू वावरत...१
कधीतरी कुठल्यातरी
फटीतून
देत मला दर्शन..२
ते क्षणभर तेजाचे
झळाळणे
पुन्हा हरवणे .. 3
घडतच राहते क्वचित अवचित
तरीही असते पसरवत
तुझी आभा जगतात ... ४
ते सुखाचे इवलाले क्षण
आनंदाने झेलित
माझे जगणे असते वाहत .. ५
नंतर मी राहतो साहत
मेघांचा दुष्टपणा
जो माहीत नसतो त्यांना ..६
कृपा अवकृपेविना चालतो
हा अव्याहत खेळ
भोवताली दाटतो रातराणीचा दरवळ ...७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा