दरबार
******
सत्तेचा आवाज उंच होत होता धारधार
कधी माणूस तर कधी खुर्ची बोलत होती
दरबारी सारे जुने गप्प गुमान ऐकत होती
दरबार्यांच्या हाती चाव्या गरगर फिरणाऱ्या
कोटी कोटी उड्डानाच्या उंच उड्या मारणाऱ्या
सरदाराही माहीत होते दरबारीही जाणत होते तरीही मान हलवीत जी जी हुजूर म्हणत होते
सरदाराची मोठी चावी दरबार्यांची छोट्या चाव्या काही वेडे पेर त्यात त्यांनी फेकून दिल्या चाव्या
मग त्या आवाज नव्हता वा ऐकला जात नव्हता कानी खणखणाट मोठा कुठे वाहत जात होता
विक्रांत प्यादे एक होऊन खेळ सारा पहात होता अजब दुनिया तुझी दत्ता किती असे म्हणत होता
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा