आधार
******
फुटक्या नावेस किनार्याची आस
तैसा जगण्यातदत्ता तुझा ध्यास
लागता लागता परी कधी थडी
वाढतो प्रवाह जातो देशोधडी
काय दैव करे अशी काही कृती
पाप फळून वा होय ताटातूटी
कळे ना मजला काय हे फेडणे
तरता तरता संसारी बुडणे
बुडता बुडता पुन्हा देई हाक
येवून कृपाळा मजलागी राख
कोमल कृपाळू देई तुझा हात
नकोस विसरू विक्रांता हे नाथ
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा