शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

बंध

बंध
****

असू देत बंध 
कुठल्या जन्मांची 
तया तुटायची 
वेळ आली ॥

बंधातून बंध 
जातात वाढत 
जीवा आवळत 
पुन्हा पुन्हा ॥

बीजातून बीच 
येतसे जन्माला
देतसे रानाला 
जन्म मोठ्या ॥

म्हणूनिया जड 
झालो भगवंत 
सुखाची संगत 
सोडुनिया ॥

सुखा घाबरतो 
दु:खा बिलगतो 
जेणे कंटाळतो 
जन्माला या ॥

विक्रांत आर्जव 
करतो दत्ताला 
करी रे मोकळा 
मज लागी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महाकाळ

महाकाळ ******** कोण घालते जन्माला कोण मारते कशाला  ढिग थडग्यांचा थोर गाव चितांनी भरला ॥ इथून तिथून सारी वाट अश्रुंनी भिजली  कणाक...