शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मेघ होई रे

मेघ होई  रे
********

मेघ होई रे 
श्री गुरूदत्ता 
कोसळ आता 
माझ्यावरी ॥१॥
क्लांत काय मी 
तुझिया विना 
धाव धाव ना 
झडकरी ॥२॥
तापत्रयाने 
होरपळलो
व्यर्थ जगलो 
आजवरी ॥
जळते काया 
छळते माया 
श्री गुरूराया 
त्वरा करी ॥
जरी ना भक्त 
याचक फक्त 
परी अवगत 
पथ करी ॥
मग विक्रांत 
होऊन शांत
राहो चालत
तयावरी ॥ 

*****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...