मुळ कविता डॉ.बीना अपोतीकर
*************************
राहू दे ना मला
मी जशी आहे तशी
पहा इकडे
एकदा माझ्याकडे
तू माझ्यावर खरेखुरे
प्रेम का करत नाहीस ?
तू मला नीट
समजून का घेत नाहीस ?
खरंच मी कशी आहे
अगदी खरोखरची अशी?
अगदी लहानपणापासून
मला आठवतं तेव्हापासून
मी होते छोटीशी छकुली
अन करायची प्रयत्न
तुला खुष करायचा
अगदी नकोशी वाटणारी
न आवडणारी
ती घर काम करूनही
मला खरंच
कधीच नाही आवडायचं
तरीही मी घासायचे
साफ करायचे
ते जुनाट खिडकीचे गज
अन प्रत्येक रविवारी
बाबांची मदतनीस होऊन
जायची पंखी साफ करायला
खरंतर मला अजून झोपावसं वाटायचं
काही कवितेत लिहावसं वाटायचं
कुठल्यातरी स्वप्नात रंगून जावं असं वाटायचं
पण मी कधीच तक्रार केली नाही
मी घालायचे तेच
जाडजुड बाटाचे सँडल्स
(ती कंपनी त्यांना का बनवायची
हे मला न सुटलेलं कोडं आहे )
महिनोन् महिने वर्षानुवर्ष
जोवर माझे पाय
मोठे होत नाही तोवर वापरायचे त्यांना
मी नाहीच मागितले कधी
छानसे झगमगीत सुंदर कपडे
मला मिळायचा फक्त एकच ड्रेस
दर दिवाळीला !!
मी कधीच मागितला नाही
मला कधीच मिळाला नाही
एखादा आवडलेला पदार्थ
जे समोर येईल ते मी खात होते
अगदी कडू कारले ही
कधीकधी ग्लासभर
कडू लिंबाच्या पानाचा रसही
किंवा ती वास मारणारी कच्ची अंडीही
माझ्या विरळ केसावर
तू ओतायची
विचित्र वासाचे तेल
दररोज
अन बांधायची
माझ्या केसांची वेणी
वेडीवाकडी विचित्र
मला कळायचा तुझा सद्हेतू
पण तू मला कधीच विचारले नाहीस
की मला काय वाटते ते
खरंच खूप खूप त्रास व्हायचा गंआई
त्या सगळ्यांचा
त्यामुळे मला वाटू लागायचे
कि मी कुरूप आहे
किती बेढब आहे
किती कमी आहे माझ्यात
अन हळूहळू
हरवायचा माझा आत्मविश्वास
मी कोसळायची आत्मग्लानीच्या
खोल विवरात
आई मी खूप खूप अभ्यास करायची
अगदी तल्लख बुद्धीची असूनही
पण एक मार्क कमी पडला शंभराला
तरी बाबांच्या चेहर्यावरील
हिरमोड मला वाचता यायचा
पण तरीही मी खंबीरपणे निश्चयाने
चालू ठेवायची माझी वाटचाल
मला खेळायला खूप आवडायचं
मी खूप चांगली खेळायची
पण तू मला खेळायला
कधीच प्रोत्साहन दिलं नाहीस
तू कधी पहायचा प्रयत्न केला नाहीस
किआई
मला हि एक मन आहे
मी खूप दुखावले आहे ग आई
मला प्रेम हवे आहे ग आई
कदाचित करतही असशील तू
प्रेम तुझ्या पद्धतीने
पण मला ते कधी जाणवलंच नाही
तू माझ्या बहिणीला
कधी तिच्या मनाविरुद्ध
वागण्यापासून
थांबवू शकली नाहीस
परावृत्त करू शकली नाहीस
कारण ती होती
खूप हट्टी आणि खमकी
आणि तिला कसे वाकवायचे
हे तुला कधीच कळत नव्हते
मी जशीजशी मोठी होत गेले
तश्या अधिक चुका करत गेले
फक्त थोड्या प्रेमासाठी
आणि थोड्या कौतुकासाठी
मी वाकत गेले
तुझ्यासाठी तुझ्यापुढे
पण फार ओढू नकोस
मी वाकले पण तुटले नाही अजून
कदाचित मी चुकले असेल
मी चुकीची व्यक्ती पकडली असेल
हरवलेल्या प्रेमाची आशा धरून
ते मिळवण्यासाठी
आता मला माझे सुख
माझा आनंद शोधायचा आहे
नव्हे मिळवायचा आहे
अन तू तरीही मध्ये
भिंत निर्माण करत आहेस
तुला हव आहे का
मी दुःख आणि वेदना
सहन करतच राहावे ?
सहन करतच जगावे ?
पुन्हा एकदा
या 25 वर्षानंतर सुद्धा !
मी मागते फक्त एकच मागणे तुला
तू माझ्या जवळ उभी राहा
माझा आत्मविश्वास जाणून घे
मला कधीच सोपे नव्हते
तू माझ्यावर केलेले
सारे संस्कार पुसून काढणे
त्यांच्या जोखडातून बाहेर पडणे
सतत वाटणाऱ्या भीतीत
गुदमरत जगत राहणे
खरंच खूप अवघड असते
या संस्कारातून बाहेर पडणे
या चक्रातून निसटणे
कारण मला वाटतेय
मीसुद्धा तेच तर करते नाही ना?
माझ्या मुलांबरोबर.
मला थांबायला पाहिजे
मला तू व्हायचे नाही
मी प्रयत्न करतेय
हळू हळू यशस्वी होतेय
खूप अवघड रस्ता आहे हा
आणि हा प्रवास
पूर्णत: अनिश्चित
जरी वयाची बंधने
मला जाणवू लागले आहेत
मला पकडून ठेवू लागली आहेत
पण मी हार मानत नाही
मी हार मानणार नाही
मला निघायचे आहे
मला मुक्त व्हायचे आहे
मला मी व्हायचे आहे
अनुवादक
*****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***********
I want to be me.
Look at me,Mother
Why can't you truly love me
Why can't you understand
Who I truly am?
Right from the time
I was a little girl
I tried to please you
I did all kinds of unpleasant chores
Even when I didn't feel like
I cleaned the bars of our old fashioned windows every Sunday
I became the assistant to Papa
In cleaning the fans
When I wanted to sleep a little more
Write some poetry
Or dream some more
I never complained
I wore the same sturdy Bata sandals
( I never understood why they made them such)
For months to years
Until my feet became too big for them.
I never asked for fancy clothes
Just the one dress
I got on every Diwali
I never asked for
Or had any favourite dishes
Just ate whatever was made
Even the forcefed bitter karela
Or the glassful of neem juice
Or the smelly raw eggs
I had thinning hair
You put the funny smelling oils every day
Tied my hair in funny uneven plaits
I understood your best intentions
But you didn't ask how I felt
I endured through it
It made me feel real ugly
Like I was lacking
It made me lose my confidence.
I worked hard at my studies
Even though I had the best memory
Just one mark short of 100
Papa's disappointment so evident
Yet I continued doggedly.
I was good at sports
I enjoyed it
Yet you never encouraged it
You never tried to figure
I had a mind too
I was hurting deep inside
I wanted to feel loved
Maybe you did love me in your own way
But I never felt it
You never forced my sister against her wishes
Because she was stubborn
And you didn't know how to bend her
I have made mistakes
As I grew older
Just to seek some love and validation
I bent backwards for you
Don't stretch it too far
I am bent,but not yet broken
I found the wrong person
Hoping to find all the missing love
Now that I want to seek my own happiness
You still put up a wall
You want me to endure pain and suffering
All over again
Even after twenty five years of it
All I am asking of you
Is to stand up for me
To have faith in me
To understand my confidence
It's not been easy
To unlearn and step out
Of all your conditioning
Of always living in fear
Conditioning,that is hard to eviscerate
'Coz I am doing the same with my children
I need to stop
I don't want to be like you
I am trying
Succeeding slowly
Now that I have
I am not going back
I know the path is tough
The journey unpredictable
Even though
Age is catching up with me
I can't give up now
I have to go on
I have to be free
I have to be me.
-Bina Apotikar.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा