शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

पुस्तकं


पुस्तक
******

पान उलटते
जीवन सरते
वाचन झाले
नियति म्हणते ॥
नव्या पानी 
नवीन घटना 
नवीन पात्रे 
नवीन गणना ॥
प्रकाश पडला 
म्हणून आजचे
जाता तमात
होई कालचे ॥
ग्रंथ केवढे 
कितीही पाने 
कुणा न  ठावे
किती वाहणे ॥
आणि वाचक 
काळ भुकेला 
थांबेना मुळी
पुढे चालला ॥
अरे विक्रांता 
तुझी ती कथा 
कुठवर आली  
पहा आता ॥
काळ थकतो 
वा नच नियति 
ग्रंथ वाढतो
ऐसिया रिती ॥
पुन्हा वाचणे
वा न वाचणे
कोण ठरविते 
कोण जाणे .॥
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...