रविवार, २० सप्टेंबर, २०२०

गिरनारचा रोप वे

किती कळवळा 
करशील दत्ता 
रोप-वे मी आता 
दारी नेशी॥
झिजलेले सांधे 
दुखणारे पाय 
वेदना उपाय 
करसी तू ॥
भक्तीला विज्ञान 
आले सहायाला 
दत्ता भजायाला 
नम्रतेने ॥
परी तेथे राहो 
सदा पवित्रता 
तिच ती शांतता 
सर्वकाळ ॥
व्हावा न व्यापार 
सहली अपार 
बाजारी प्रकार 
कधीकाळी ॥
विक्रांत बोलतो
बरळ हि वाचा 
अवघा दत्ताचा 
खेळ जरी ॥
दत्ताची करणी 
दत्तची तो जाणे 
आम्हा येणे जाणे 
सुकर हे ॥
भावबळे येती 
भटकाया येती 
दत्त मर्जी येती
सारे इथे ॥

*****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...