बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

दत्तमय

दत्तमय
*******
दत्ताच्या घरात
राहतो विक्रांत
दत्ताला स्मरत
सदोदित

दत्ताचा प्रसाद
भक्षितो विक्रांत
दत्ताचे मानत
आभार ते


दत्त छत्राखाली
निजतो विक्रांत
दत्ताची पाहत
सुखस्वप्ने

दत्ताची नोकरी
करतो विक्रांत
दत्ताचा आज्ञेत
कृती करी

दत्ताच्या भक्तीत
राहतो विक्रांत
सदा ह्रदयात
दत्त पाही

(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...