सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

वाडीला



वाडीला
*****

आलो मी वाडीला
कृष्णेच्या तीराला 
पाहीले दत्ताला 
वृक्ष तळाला

सनातन वाटेला
दत्ताच्या  घाटाला
भिडलो पाण्याला
तीर्थ जळाला

दत्ताच्या गजरी
पालखी साजरी
बसतो वैखरी
भक्तांच्या दत्त

पाहीला मालक
विश्वाचा चालक
सृष्टीचा पालक
वाडीमध्ये

दत्ताला पाहता
सुख विक्रांता
वाटतो जगता
गीत रूपे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हौस

हौस **** रित्या अंतरात रिताच कल्लोळ  शून्याचा महाल शून्यातच  त्याच त्या सुखाचा उठे पडसाद  जीर्ण अवसाद घेऊनिया  कोसळती उल्का कळल्...