रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

बंध नको



बंध नको
****
बंध नको मज
या जगताचे
देह मनाचे
अन् काळाचे

बंध नको मज
मृदू स्पर्शाचे
मधु डोळ्यांचे
ऋजु शब्दांचे

बंध नको मज
धन मानाचे
यशोगाणाचे
सुखसौख्याचे

बंधनातित मी
माझ्या मधला
तर मग हे रे
भास कशाचे

अवधूता हे
सांग मला रे
ओझे असले
असे कश्याचे


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...