००
तू दिलेले आभाळ वेदनांचे
अजून माझ्यातून ठिबकत आहे
कधी न संपणारा हा पाऊस
अधिकाधिक गडद होत आहे
पान अन पान ओले जीवनाचे
मन फांदीवरून स्मृतींचे
प्रवाह ओघळत आहे
किती विखुरली हिरवी पत्रावळी
मरूनही चूर जगण्यात आहे
तू लावलेली आग उद्वेगाची
सारे घरदार जाळत आहे
मी सुखातून सदा हद्दपार
क्षणोक्षणी असा होरपळत आहे
प्रत्येक सुखाला स्पर्श हा माझा
राखेत परिणत करीत आहे
कुजबुजी मधून जग
आश्चर्य व्यक्त करीत आहे
जिवंत कसा हा अजून
चितेत विक्रांत आहे
माझ्या निस्तब्धतेवर कोसळत
तू धडाडून अस्तित्व हे संपवित आहे
अर्धे अधुरे हे असावे माझे जळणे
पूर्णत्वास मी माझ्याच आक्रंदत आहे
घडण्या न घडण्याची निरर्थकता
मनात सदैव हिंदोळत आहे
सरू सरू आले देह मन
कामनेत तुझ्या अतृप्त आहे
०००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
https://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा