अवघा प्रकाश
दाटला कल्लोळ
दिशांना भोवळ
अस्तित्वाची ||
नारायण नभी
नारायण मनी
भरे कणोकणी दिव्य
आभा ||
रंगांचे विभ्रम
चाकाटले चित्त
सुवर्णाचा पोत
जीवनाला ||
सरला अंधार
गात्रात दाटला
डोळिया पाहीला
दिव्यारूण ||
सरे कुतूहल
सृष्टीचे सकळ
अनंत अपार निरंजन ||
अंतर्बाह्य शुद्ध
निजात्मज्योती
कापुराची वाती विक्रांत हा ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा