नऊ महिन्यापूर्वी
माझ्याकडे एक
लिस्ट होती
अगदी लहान
न आवडणाऱ्या माणसांची
हाताच्या बोटावर
मोजता येण्यासारखी..
..
आज सहज ती लिस्ट
पाहू लागलो तर
ती भेंडोळी
जमीनीपर्यंत
पसरली
आणि मग उगाचच
नको ती नावे
दिसू नयेत म्हणून
गडबडीत ती यादी
मी पुन्हा मनात
दडवली
ऐकले होते
प्रशासन
सांभाळायचे
खूप तोटे असतात
अन स्वीकारलेही
होते
काही प्रमाणात
पण हे जरा
जास्तीच झाले
नाही का ?
तसेच ती यादी
गुंडाळतांना
उडत उडत एक नाव
वाचल्या सारखे
झाले
अन सारखे सारखे
वाटत होते
ते नाव.....
माझे तर
नव्हते ?
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा