शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

संतसंग






केले दत्तराये उपकृत मला
संतसंग दिला मागितला ||
सत्संगाची राजे प्रभूचे प्रेमिक
भक्त अलौकिक भेटविले ||
एकटा उदास चालतांना वाट
गोकुळीचा थाट दावियला ||
ज्ञानाचे पुतळे ध्यानाचे पर्वत
भक्तीरूप व्यक्त सखे केले  ||
जीजी आलो आता माझ्या मी माहेरा
मिळाला निवारा जीवास या ||
आता मनोमळ सहज जाईल
पावेन निर्मळ निजरूप ||
सरो नाव गाव मागतो विक्रांत
संताच्या दारात जन्म जावो ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुरुदेव

गुरुदेव ***** एक वारी दक्षिणेला एक जाय उत्तरेला  तोच शोध अंतरात फक्त दिशा बदलला ॥ एक वारी गुरुपदी एक वारी देवपदी  तोच ओघ सनातन ध...