रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

प्रवास




तुझ्या अस्तित्वाचा गंध
दरवळणारे क्षण
कधी भेटलेच नाही
असे मुळीच नाही

या प्रदीर्घ वाटचालीत
तू सोबत नाहीस असे
वाटणारे उदास क्षण
आले नाहीत असेही नाही

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर
मी अजूनही झुलतो आहे
लख्ख प्रकाशाचे आकाश
अजूनही खुणावत आहे

तुझे भेटणे गणित असेल तर
ते माझे अगदीच कच्चे आहे
तुझे भेटणे अपघात असेल तर
तुझा हि नाईलाज आहे माझ्यासोबत

तसे म्हटले तर हजार दारे आहेत
तसे म्हटले तर एकही दार नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...