आजकाल नको आहे त्यांना
सहजच होणारे
थोडेसे जास्तीचे
काम
अन थोडीशी सोय
झालेली कुणाची
आता आताशा
सेवेचे मापदंड
बदलले आहेत
सहकार्याच्या
व्याख्याही
बदलल्या आहेत
माणसं बदलली आहेत
का परिस्थिती
बदलली आहे
का ठराविक
माणसांची
लुडबुड वाढली आहे
कुणास ठावूक
पण एक जिनसी
एकोपा असलेली
जगण्याची रीत
अन एकमेकात
मिसळून जाणारी
मनाची वीण
उसवत चालली आहे
एवढ मात्र खर !!
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा