शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

मागणे






दे कुरूपता दे विरूपता
पण उरात तयाची खंत नसू दे
दे सुरेखता दे गुणवत्ता
मन गर्वाने पण मत्त नसू दे
दे धनिकता दे संपन्नता
मोह तयाचा नच खोल रूतू दे
कर निष्कांचन दरिद्रता दे
लाचार मत्सर तयात नसू दे
हे दे अथवा मजला ते दे
तुझी स्मृती पण सदैव असू दे

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माय

माऊली ******* चालव माऊली तुझ्या वाटेवर  जन्म पायावर उभा कर  रांगलो बहुत घेऊनी आधार  इथे आजवर काल्पनिक  भ...