रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

विवस्त्र याचना ..






 धावणाऱ्या मना
पोसत्या वासना
तुझ्या पायावरी
आता दयाघना

विझत्या श्वासांना
कळतात खुणा
येवून सांभाळ
आता दयाघना

असे जगतांना   
व्यर्थ तुझ्याविना
दाटे रितेपणा 
आता दयाघना

सुख शोधतांना
कैफी धावतांना
उजाड कामना
आता दयाघना

तुटल्या शब्दांना
विझल्या स्वप्नांना  
घेशील ना हाती
आता दयाघना

तुज मागतांना
लाज वाटते ना
विवस्त्र याचना
आता दयाघना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...