हॉस्पिटलमध्ये आलेल्या सकपाळ सिस्टर
आणि रिटायर होवून जाणाऱ्या सकपाळ सिस्टर
यात जमीन अस्मानाचा फरक आहे
एम. टी. आगरवाल रुग्णालयामध्ये
आलेला हा खळाळता झरा
आता विशाल संतृप्त नदीपात्रात
परिवर्तीत झाला आहे
त्यांच्या या वास्तवात त्यांनी
या रुग्णालयाला आणि सहकाऱ्यांना
खूप भरभरून दिले आहे
खरतर ज्यांनी त्यांच्याकडून घेतले
त्यांना भरभरून मिळाले आहे
नदीचे कार्य निर्हेतुकपणे देणे एवढेच असते
ते त्यांनी निष्टापुर्वक व कर्तव्यदक्षपणे केले
यात वेगळे काही केले नाही
कारण तो त्यांचा सहज स्वभाव आहे ...
त्यांनी केलेला हैप्पी ग्रुप असो
घेतलेले योगाचे क्लास असो
आयोजित केलेली पिकनिक असो
साजरा केलेला महिला दिन असो
ब्रह्मकुमारीची प्रवचन असो
त्यात एक शिस्त एक सूत्रबद्धता
आणि आपलेपणाचा ओलावा सदैव दिसे
तसेच त्यांच्या सूक्ष्म तटस्थ निगर्वीपणात
एका साधिकेची ध्येयासक्ती
सदैव अधोरेखित होत असे ...
प्रत्येक नदीचे एक गंतव्य स्थान असते
तिला सागराशी एकरूप होण्याची ओढ असते
या महानदीला माहित आहे की
तिला कुठे जायचे आहे ते !
त्यांच्या त्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा
आणि स्नेहपूर्वक निरोप .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा