रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

समुपदेशन ...स्थानी





मी अन ती नकळे कसे सोबत जगतो
एकमेका शाप देत उ:शाप जणू भोगतो
ओंजळी भरून सुख धावुनी मी आणतो
कोरडेच हात तिचे ओठ कोरडे पाहतो
साचली पाप मागील जन्मात या फेडतो
का नवीन बंध बेगडी गळ्यात या बांधतो
होणार ना सुटका जरी वाट सदैव पाहतो
घालून कोट लत्करी मखमली मिरवतो
मोडलेला डाव माझा बळे मनी दडवतो  
खेळणे दैवे प्राप्त जे गपगुमान खेळतो
हीच कारा हीच कबर जन्मठेप मानतो
काय केला गुन्हा परी ते नच जाणतो 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...