शुक्रवार, १८ जुलै, २०१४

पालखी चालली




अवघा बाजार
चेंगराचेंगर
मिळे पायावर
क्षण मात्र ||१
पेटके पायात
गचांड्या दारात
अशी यातायात
घडे खरी ||२
मेंढरांचा देव
मेंढरांचा भाव
डोळीयांना ठाव
मोल परी ||3
जपणे देहाचे
रडणे मनाचे
कळले कुणाचे
काय असे ||४
सुटता सुटले
धरता धरिले
अवघे कोंडिले
मीच मला ||५ 
जयाने पाहिली
तयास कळली
पालखी चालली
माऊलीची ||६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लक्ष्य

लक्ष्य ***** माझी प्रकाशाची हाव  तुझ्या दारी घेई धाव  असे पतंग इवला  देई तव पदी ठाव  गर्द काळोख भोवती  जन्म खुणा न दिसती  आला कि...