शुक्रवार, १८ जुलै, २०१४

गोड गोजिरी





गोड गोजिरी
एक साजरी  
खट्याळ पोर  
जगास भारी

खऱ्यासाठी ती
भांड भांडते  
व्यवहारी नि
रोख असते

जरा नाजूक
कणखरशी
जगा ओळखे
खूप खूपशी

राग असतो
नाकावर तो
शब्दामधून
तडतडतो

साऱ्या साठीच 
धाव धावते
ऊन पावूस 
नच पाहते

नका विचारू
कोण असे ती
इथले सारे  
तिला जाणती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...