मनाच्या घरास
मनाचेच दार
पिसाट विचार
दारात अपार
उघडता दार
पडतसे धाड
घुसतात आत
विना भीडभाड
तूच ठरविता
तयांचा व्यापार
धावणे पाळणे
होणे थंडगार
जाणताच बंड
पडले मोडून
साक्षीचे पाहणे
आले उमलून
पाहता पाहिले
मन निवळले
मीपण जागले
दु;ख हरविले
सुटुनिया गेली
रेंगाळली वाट
मनी उगवली
नवीन पहाट
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा